नियम आणि अटी


  1. जलमित्र म्हणून नोंदणी करणे हे संपूर्णपणे स्वयंसेवी कार्य असून त्या कामाच्या बदल्यात स्वयंसेवकांना कोणतेही मानधन किंवा कोणत्याही खर्चाची परतफेड केली जाणार नाही.
  2. श्रमदान हे कष्टाचे कार्य आहे. शारीरिक श्रमामुळे आरोग्याला अथवा जिवाला हानिकारक ठरणाऱ्या हृदयविकार किंवा त्यासारख्या कोणत्याही आजाराने स्वयंसेवक ग्रस्त नसावेत.
  3. स्वयंसेवकांनी या कार्यात स्वतःच्या जबाबदारीवर भाग घ्यावा. स्वयंसेवकांच्या कोणत्याही वस्तू, आरोग्य किंवा बऱ्या-वाईट अनुभवांसाठी पानी फाउंडेशन जबाबदार नाही.
  4. स्वयंसेवकांना श्रमदानाच्या गावापर्यंत जाण्या येण्याचा खर्च व त्या संदर्भात झालेला अन्य खर्च स्वतः करावा लागेल. पानी फाउंडेशन यांपैकी कोणत्याही खर्चाची जबाबदारी घेणार नाही.
  5. तुम्ही पुरवलेली माहिती सुरक्षित ठेवणे आमच्यासाठी महत्वाचे आहे व त्यासाठी आम्हास उपलब्ध सेफगार्ड्स वापरत आहोत.
  6. तुम्ही पुरवलेली माहिती जसे की तुमचे नाव, इ-मेल, मोबाईल क्रमांक, आम्ही पानी फाउंडेशनच्या कामासाठी वापरु.
  7. आम्ही तुम्हाला बातमीपत्रे आणि इतर साहित्य असलेले इ-मेल्स आणि मेसेजेस पाठवू. तुम्हाला जर ते नको असतील तर तुम्ही कधीही opt out किंवा unsubscribe यापैकी एक विकल्प निवडू शकता.
  8. पानी फाउंडेशनला एखादी सेवा पुरविण्यासाठी जर 'थर्ड पार्टी सर्विस प्रोवायडरला' तुम्ही पुरविलेल्या माहितीची गरज पडली तर तुमची माहिती त्यांच्या बरोबर शेअर करण्यात येईल जो वापर ते फक्त पानी फाउंडेशनला सेवा पुरविण्यासाठीच करु शकतील.
  9. तुम्ही हा फोर्म भरून मान्य करता की तुम्ही पुरविलेली माहिती बरोबर आहे आणि ती तुमचीच माहिती आहे.
  10. तुम्ही हा फोर्म भरून मान्य करता की यांतील माहिती तुम्ही स्वेच्छेने आणि संपूर्णपणे तुमच्या जबाबदारीवर देत आहात.